Weather Update l दिवसेंदिवस राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र या वाढत्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशातच आता हवामान विभागाने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील तापमानात चढउतार :
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात घट होताना दिसत आहे. अशातच राज्यातील बहुतांश ठिकाणी 2 ते 4 अंशांनी तापमान घसरल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तसेच राज्यात येत्या 24 तासांत किमान तापमान पुन्हा एकदा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भ वगळता उर्वरित राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ या भागातील काल तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. त्यामुळे धुळ्यात किमान तापमान हे 4.4 अंशांवर पोहोचले होते. अशातच उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात मोठया प्रमाणात घट झाली असून नागरिक देखील थंडीनं कुडकुडले आहेत.
Weather Update l राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार? :
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळत असल्याने अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. त्यामुळे आता येत्या 24 तासानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
त्यानुसार, कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 24 तासात तापमानात किमान तापमान घसरणार आहे . तर विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार आहे. याशिवाय राज्यात हलक्या ते मध्यम सरींची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामान विभागाने 10 जानेवारी व 11 जानेवारीला पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देखील हवामान विभागाने दिला आहे.
News Title : Today maharashtra Weather Update
महत्वाच्या बातम्या –
चार्जिंगचं टेन्शन विसरा, आता बिनधास्त घ्या ई-कार; सरकारची मोठी घोषणा
बीड जिल्ह्यात आणखी एक धक्कादायक घटना, पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पात्रता फेरीतील धक्कादायक प्रकार उघडकीस
मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
शेतकऱ्यांसाठी आले कांद्याचे नवे वाण, फक्त ‘इतक्या’ दिवसात निघणार उत्पादन!