महत्वाची बातमी! हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट

Weather Update l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल होत आहेत. कधी पावसाच्या धारा तर कधी उन्हाच्या झाला जाणवत आहेत.अशातच गेल्या चार-पाच दिवसांमध्ये मुंबईसह शेजारील परिसरातील प्रचंड उकाडा वाढला आहे. गेल्या आठवड्यात या संपूर्ण परिसरात जोरदार पाऊस झाला होता. या पावसानंतर वातावरणातील आर्द्रता वाढल्याने मुंबईकरांना सध्या प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

पुढील काही दिवस उकाडा कायम राहणार? :

वाढत्या आद्रतेमुळे मुंबईकर सतत घामाच्या धारांने हैराण झाले आहेत. त्यामुळे या उकाड्यापासून कधी सुटका होणार, याची मुंबईकर आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र हवामान विभागाने यासंदर्भात एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईकरांना घामाच्या धारांशी सामना करावा लागणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांमध्ये तापमान जैसे थे राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही फारसा दिलासा मिळणार नाही. आज देखील मतदानाच्या दिवशीही मुंबईत 33 ते 35 अंश सेल्सिअस कमाल तापमान असणार आहे. त्यामुळे येत्या दोन तीन दिवसांमध्ये मुंबमधील वातावरण हे कोरडे असणार आहे.

Weather Update l मुंबईत मान्सून कधी दाखल होणार? :

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. त्यामुळे मान्सून कोमोरिनच्या काही भागात आणि बंगालच्या उपसागराच्या निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासांत निकोबार बेटांवर प्रचंड मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात दिलेल्या वेळेत दाखल झाला आहे.

अशातच मान्सून 31 मे रोजी केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्याची हवामानाची स्थिती पाहता मान्सून 31 मे रोजी भारतात दाखल होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर पुढील 7 ते 8 दिवसांमध्ये मान्सून तळकोकणात देखील दाखल होईल. त्यानंतर 13 जूनच्या आसपास मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील आणि मुंबईकरांना उकाड्यापासून सुटका होण्यासाठी कमीत कमी 20 दिवस वाट पाहावी लागणार आहे.

News Title – Today Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार! लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा कसा असणार?

आज या राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता

मोदी सरकार पुन्हा आल्यास ‘हे’ शेअर्स बनणार रॉकेट; पैसे होणार डबल

‘…म्हणून हिंदुंनी 5-5 मुलांना जन्म द्यायला हवा’; देवकीनंदन यांचं वक्तव्य चर्चेत

‘येत्या 4 जून रोजी…’; मनोज जरांगे यांची नवी घोषणा