राज्यात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाने दिला सतर्क राहण्याचा इशारा

Monsoon update l राज्यात मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. अशातच राज्यातील चिपळूणमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शहरात अनेक ठिकाणी पाऊसच पाणी साचल्याचे पाहायला मिळालं आहे. अशातच आता हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

कोकणातील बळीराजा सुखावला :

राज्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी भाताच्या पेरणीला देखील सुरुवात केली आहे. रायगडमध्ये देखील पाऊसाने हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माणगाव या भागात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. हा पाऊस प्रामुख्याने भात पेरणीसाठी लाभदायक ठरणार असल्याने बळीराजा देखील सुखावला आहे.

तळकोकणात मागील दोन-तीन दिवसांपासून पाऊस बरसला आहे. यामुळे कोकणातील बळीराजा मात्र चांगलाच सुखावल्याचे चित्र दिसत आहे. रायगड जिल्ह्यात देखील आजपासुन पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. अशातच हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात पुढील चार ते पाच दिवसाकरिता विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Monsoon update l राज्यात अतिवृष्टीचा इशारा :

राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सर्वांनी सतर्क रहावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तासात रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. तसेच वादळी वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी प्रतीतास असणार आहे.

राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील कुशीत असलेल्या कोटबांधनी परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे नागरिकांची अचानक पाऊस आल्याने तारांबळ उडाली आहे. मात्र या परिसरात उष्णतेचा पारा प्रचंड प्रमाणात वाढला होता. त्यामुळे या भागात पाऊस पडल्याने उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. तसेच या पावसामुळे सातपुड्यातील शेतकऱ्यांच्या शेती कामांना देखील वेग आला आहे.

News Title – Today Monsoon update

महत्त्वाच्या बातम्या

आज या तीन राशींना पैशांची कमी भासणार नाही

‘शेतकऱ्याच्या मुलीने गाल लाल केल्यावर…’; कंगना रणौतच्या प्रकरणात बजरंग पुनियाची उडी

फडणवीसांना कितव्या रांगेत बसवलं?, दिल्लीतील गोष्टीची महाराष्ट्रात जोरदार चर्चा

नितीश कुमार मोदींच्या पाया का पडले?, ‘या’ 4 कारणांची जोरदार चर्चा

‘मासे न खाताच…’; वसंत मोरेंनी राज ठाकरेंना डिवचलं