बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खानचं भविष्य आज ठरणार; जामीनावर होणार सुनावणी

मुंबई | ड्रग्ज प्रकरणात मागील काही दिवसांपासून तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या आर्यन खान केसचा आज काय तो निकाल लागणार आहे. बुधवारी म्हणजे कालच आर्यनच्या जामीनासाठी त्याच्या वकिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज कोर्टात एनसीबी आपली बाजू मांडणार आहे. त्यानंतर कोर्ट या प्रकरणी निर्णय देणार आहे.

मुंबई एनडीपीएस कोर्टाने आर्यनचा जामीन फेटाळला होता. आर्यनसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंट यांचेही अर्ज एनडीपीएस कोर्टाने फेटाळले होते. त्यामुळे या तिघांनीही जामीनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी एनसीबी आज कोर्टात आपली बाजू मांडणार आहे. त्यानंतर कोर्ट याप्रकरणावर निर्णय देणार आहे.

कोर्टाचा आजचा निर्णय आर्यनच्या भवितव्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरूंगात आहे. त्याच्या सोबत मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट हे देखील तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. आर्यन खान मागील 21 दिवसांपासून तुरुंगात आहे. त्यामुळे आर्यन खानला आजही जामिन मंजूर झाला नाही तर त्याचा अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

आर्यन खानचा जामीन याआधी अनेकवेळा फेटाळला गेला आहे. परंतु जर आजही आर्यन खानचा जामिन कोर्टाने फेटाळला तर कदाचित आर्यनला त्याची दिवाळीही तुरूंगातच घालवावी लागू शकते. त्यामुळे आज कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“एका महिलेशी कसं बोलावं हे पवारसाहेबांनी शिकवलं नाही का?”

“पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले की मोदींची दाढी एक इंच वाढते”

“…तोपर्यंत ड्रग्स प्रकरणाची चौकशी समीर वानखेडेचं करतील”

“ही निवडणूक केवळ देवेंद्र फडणवीसांचं मुंगेरीलालचं स्वप्न”

“आता खरे सुत्रधार बाहेर येतील, ही तर मोदी सरकारला मोठी चपराकच”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More