बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’; सकाळी 11 वाजता देशाला संबोधित करणार

नवी दिल्ली | आज सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. मोदी आज मन की बातमधून कोरोनाचा आकडा आणि लसीकरणाचा वेग या स्थितीवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

मन की बात कार्यक्रम आकाशवाणी, दूरदर्शन समाचार, पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित होईल. हे त्यांचं 78 वं संबोधन असेल.

मोदींचा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन समूह नेटवर्क किंवा आकाशवाणीच्या वेबसाईट सोबतच अॅपवरही प्रसारित होणार आहे. सकाळी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात देशातील लोकांसोबत आपले विचार शेअर करतील.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोदींनी जम्मू काश्मीरमधील सर्वपक्षीय गुपकार नेत्यांची दिल्लीत बोलावली होती. या बैठकीत या सर्वपक्षीय नेत्यांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या. यानंतर मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भातही नरेंद्र मोदी आजच्या मन की बातमध्ये बोलण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘दोन्ही डोस घेतलेत म्हणून निर्धास्त राहू नका, कारण…’; डेल्टा व्हेरिएंटबाबत WHO ने दिली महत्वाची माहिती

पुण्यात गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ

“तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता, भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये”

डेल्टा प्लस व्हेरिएंटपासून सुरक्षिततेसाठी AIIMSच्या संचालकांनी सांगितला हा मोठा पर्याय!

‘ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, पण…’; गुलाबराव पाटील यांचं आवाहन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More