बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे कोरोना अपडेट, वाचा आजची आकडेवारी!

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. तर डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 175 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 253 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 3 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,99,228 इतकी आहे. तर पुण्यात 1781 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आत्तापर्यंत एकूण 8997 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 4,88,450 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7891 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या- 

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींनी अफगाण मुलींबाबत केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

धक्कादायक! महिलेच्या गळ्यात अडकली कोरोना चाचणीच्या कीटमधील कांडी, त्यानंतर….

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

सोनाली नवांगुळ आणि मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

‘संजय राऊतांच्या अंगात आलं अन् राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More