Top News पुणे महाराष्ट्र

पुण्यात कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू; आज पुण्यात किती रुग्ण आढळले?

पुणे | पुण्यात आज (२६ एप्रिल) कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर पुण्यात आज दिवसभरात कोरोनाचे ७२ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

पुण्यातील डॉ. नायडू रुग्णालयात सध्या एकूण ३६७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर कोरोनाचा संसर्ग झालेले ६ रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

४४ अत्यवस्थ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. २८ रुग्णांवर ससूनमध्ये तर उर्वरित रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. पुण्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११३९ झाली असून बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्यानं सध्या पुण्यात ९०२ कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात आज नव्या ४४० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या ८०६८ झाली आहे. आज ११२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११८८ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यात आज आढळले कोरोनाचे नवीन ४४० नवे रुग्ण; पाहा तुमच्या जिल्ह्यात किती?

’21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल’; संशोधकांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

कोरोनाविरोधातील लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश देईल- देवेंद्र फडणवीस

वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं चौकशीत निष्पन्न- अनिल देशमुख

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या