Ajit Pawar Candidate l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच काल भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी कधी जाहीर होणार याची महत्वाची माहिती समोर आली आहे.
आज पहिली यादी जाहीर होणार :
राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्रातील 288 मतदारासंघात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर 2024 ला निकाल देखील जाहीर होणार आहेत. मात्र आता अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याचा मुहुर्त देखील ठरला आहे.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होणार आहे. तर या यादीत विद्यमान आमदारांची नावे असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आहे. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी ही फक्त 32 ते 35 उमेदवारांचीच असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता या यादीत नेमक्या कोणकोणत्या उमेदवारांना संधी मिळणार आणि कोणकोणत्या दिग्गजांचा पत्ता कट होणार हे थोड्याच वेळात समोर येणार आहे.
Ajit Pawar Candidate l उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वीच एबी फॉर्म दिले :
राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच एबी फॉर्म देखील देण्यात आले आहेत. तसेच आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर उमेदवारी निश्चित असलेल्या उमेदवारांना बोलवण्यात देखील आले होते. यामध्ये संजय बनोसेडे, चेतन तुपे, राजेश विटेकर यांसह उमेदवारी निश्चित झालेले सर्वजण देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप देखील करण्यात आले आहे.
यावेळी वडगाव-शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर उपस्थित होते. या सर्वांना देखील एबी फॉर्मचेही वाटप करण्यात आले आहे.
News Title : Today Release Ajit Pawar Candidate List
महत्वाच्या बातम्या –
लाडकी बहीण योजना बंद? आदिती तटकरेंनी सांगितलं यामागचं खरं कारण
बीडमध्ये मोठी उलथापालथ; पंकजा मुंडेंना धक्का
भाजपमध्ये बंडखोरीला सुरवात? ‘या’ नेत्याची सागर बंगल्यावर धाव
उमेदवारी न मिळाल्याने नगरमध्ये नाराजी नाट्य; भाजपचा बडा नेता बंडाच्या तयारीत?
दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण