बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!

मुबंई | राज्यसभेच्या निवडणुकीत जो धक्का शिवसेनेला बसला त्यानंतर धक्क्याची मालिका चालूच आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड सर्वात जास्त धक्कादायक ठरलं. यानंतर शिवसेनेची गळती थाबांयचं नाव घेत नाहीये. यातच आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackery) यांना आज एकाच दिवशी पाच धक्के बसले आहेत.

शिवसेना शिंदे गटाने शिवसेनेची जुनी राष्ट्रीय कार्यकारणी बरखास्त  करत नवीन कार्यकारणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीमध्ये शिवसेना मुख्य नेते म्हणून शिंदेची निवड करण्यात आली आहे. आमदार केसरकर यांची प्रवक्तेपदी (Spokesperson) निवड करण्यात केली. आनंदराव अडसूळ आणि रामदास कदम यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. शिंदे गटाकडून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन बैठकीत शिवसेनेचे 12 खासदार उपस्थित होते. त्यामुळे आता राज्यसभेबरोबरच शिवसेनेला लोकसभेलाही धक्का लागण्याची शक्यता आहे.

रामदास कदम यांची ओळख एक कट्टर शिवसैनिक अशी आहे. त्यांनी शिवसेनेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

राष्ट्रवादी तसेच आणखी दोन पदाधिकाऱ्यांनीसुद्धा राजीनामा दिला आहे. महत्वाचं म्हणजे नुकताच ठाकरेंनी त्यांची नियुक्ती केली होती. जिल्हाप्रमुख प्रकाश रसाळ यांनी कौटुंबिक आणि आरोग्याचं कारण देत नकार दिला तर वैभव पाटील यांनीही काही तासातच आपल्या पदाचा राजीनामा दिला. या सगळ्या मुळे ठाकरेंचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. या सगळयाला ठाकरे कसे तोंड देणार पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

अभिनेता महेश बाबूनंतर अल्लू अर्जुनचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

मोठी बातमी! नाही नाही म्हणत ‘हा’ बडा नेताही शिंदे गटात सहभागी

खासदार नुसरत जहाँचा बेडरूममधील फोटो व्हायरल!

बाईक प्रेमींचं पहिलं क्रश असलेल्या Royal Enfield च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

आर. माधवनच्या लेकाचा देशाला अभिमान; केली ‘ही’ कामगिरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More