मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेनंतर पहिल्यांदाच दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेतली. त्यांच्या या भेटीवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगवला आहे.
कारण नसताना काँग्रेस, राष्ट्रवादीचं ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता आहे. ते बॅलन्स करण्यासाठी तुम्ही सोनिया गांधींना भेटून घ्या. आता बांद्र्याच्या ‘मातोश्री’वरुन नाही तर दिल्लीच्या ‘मातोश्री’वरुन निर्णय होतात हे विसरु नका, असा खोचक टोला सुधीर मुनगंटीवारांंनी लगावला आहे.
महाराष्ट्राच्या विकासासाठी मोदींकडे मदत मागतील. दिल्लीच्या मातोश्रीवर जाऊन महविकास आघाडीचं सरकार टिकावं म्हणून महाशिवरात्रीला मोदींची भेट घेतील, असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात शिवसेना आणि काँग्रेस यामध्ये काही मुद्द्यांवरुन मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर ठाकरेंनी सोनिया गांधींची भेट घेतलेली ही भेट महत्वाची मानली जात आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
आदित्य ठाकरेंसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सोनिया गांधींची भेट
“आम्ही झोपेत असलो तरी सावधपणे काम केलंय ,चौकशीला आम्ही घाबरत नाही”
महत्वाच्या बातम्या-
‘इंदोरीकर महाराजांचा हा व्हीडिओ बघाच’; रूपाली ठोंबरेंचा तृप्ती देसाईंना टोला
ब्लड प्रेशर, शुगर बॅलन्स ठेवण्यासाठी सोनियांची भेट; मुनगंटीवारांची कोपरखळी
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंंतर शरद पवार-उद्धव ठाकरे आज एका मंचावर
Comments are closed.