बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गळती थांबेनाच! उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना रोज नवे नवे हादरे बसत आहेत. काल परवा शिवसेनेसोबत असलेल्या नेत्यांनी शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेची (shivsena) गळती अजूनही चालू आहे. काल शिवसेनेच्या गटातून शितल म्हात्रे या शिंदे गटात सामील झाल्या आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

आज मीरा भाईंदरमधील नगरसेवकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत. या सर्व नगरसेवकांची संख्या 18 इतकी आहे. गुरुवारी हॉटेल लीलामध्ये भाईंदरमधील 18 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन समर्थन जाहीर केले. यामुळे शिवसेनेला मोठ खिंडार पडलं आहे. यामुळे येत्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान आहे.

मीरा भाईदरमधील 18 नगरसेवकांनी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली जाहीर समर्थन आणि पाठिंबा दिला आहे. आंनद दिघेंचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला पाठिंबा मिळत आहे. सर्वसामान्य सरकारला या 18 नगरसेवकांनी पाठींबा दिला आहे. मी त्यांचं मनापासून आभार मानतो, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.

शिवसेनेची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. येणारी निवडणूक ठाकरे सरकारसाठी आव्हानात्मक असणार आहे. या दरम्यान ठाकरे सरकारचं भवितव्य धोक्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

ललित मोदी अन् अभिनेत्री सुष्मिता सेनचं झालं लग्न?, खासगी फोटो व्हायरल

मोठी बातमी! अनिल परब यांच्या अडचणीत वाढ

“महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले”

मोठी बातमी! 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना झटका; ‘या’ वस्तू महागणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More