बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात कोरोनाचे २८१९ रुग्ण बरे होऊन घरी; पाहा आज किती रुग्ण सापडले

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  १५ हजार ५२५ झाली आहे. आज  ८४१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३५४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २८१९ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ८२ हजार ८८४ नमुन्यांपैकी १ लाख ६७ हजार २०५ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५ हजार ५२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात १ लाख ९९ हजार १८२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १२ हजार ४५६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ३४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६१७ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २६,पुण्यातील ६,औरंगाबाद शहरात १ तर कोल्हापूरमध्ये १ मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी २४ पुरुष तर १० महिला आहेत.

आज झालेल्या ३४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४  रुग्ण आहेत तर १६  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ३४ रुग्णांपैकी २८ जणांमध्ये ( ८२ टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

मुंबई महानगरपालिका: ९९४५ (३८७)

ठाणे: ८२ (२)

ठाणे मनपा: ४६६ (८)

नवी मुंबई मनपा: ४१५ (४)

कल्याण डोंबिवली मनपा: २२७ (३)

उल्हासनगर मनपा: १२

भिवंडी निजामपूर मनपा: २० (२)

मीरा भाईंदर मनपा: १८२ (२)

पालघर: ३१ (१)

वसई विरार मनपा: १६१ (४)

रायगड: ५६ (१)

पनवेल मनपा: १०७ (२)

ठाणे मंडळ एकूण: ११,७०४ (४१६)

नाशिक: २१

नाशिक मनपा: २७

मालेगाव मनपा:  ३६१ (१२)

अहमदनगर: ४४ (२)

अहमदनगर मनपा: ०९

धुळे: ८ (२)

धुळे मनपा: २४ (१)

जळगाव: ४७ (११)

जळगाव मनपा: ११ (१)

नंदूरबार: १९ (१)

नाशिक मंडळ एकूण: ५७१ (३०)

पुणे: १०३ (४)

पुणे मनपा: १८३६ (११२)

पिंपरी चिंचवड मनपा: १२३ (३)

सोलापूर: ३ (१)

सोलापूर मनपा: १२७ (६)

सातारा: ७९ (२)

पुणे मंडळ एकूण: २२७१ (१२८)

कोल्हापूर: ९ (१)

कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३२

सांगली मिरज कुपवाड मनपा: २ (१)

सिंधुदुर्ग: ३ (१)

रत्नागिरी: १० (१)

कोल्हापूर मंडळ एकूण: ६२ (४)

औरंगाबाद:३

औरंगाबाद मनपा: ३३७ (११)

जालना: ८

हिंगोली: ५५

परभणी: १ (१)

परभणी मनपा: १

औरंगाबाद मंडळ एकूण: ४०५ (१२)

लातूर: १९ (१)

लातूर मनपा: ०

उस्मानाबाद: ३

बीड: १

नांदेड: ३

नांदेड मनपा: २८ (२)

लातूर मंडळ एकूण: ५४ (३)

अकोला: ७ (१)

अकोला मनपा: ५६ (५)

अमरावती: २ (१)

अमरावती मनपा: ५९ (९)

यवतमाळ: ९२

बुलढाणा: २४ (१)

वाशिम: १

अकोला मंडळ एकूण: २४१ (१७)

नागपूर: २

नागपूर मनपा: १७९ (२)

वर्धा: ०

भंडारा: १

गोंदिया: १

चंद्रपूर: १

चंद्रपूर मनपा: ३

गडचिरोली: ०

नागपूर मंडळ एकूण: १८७ (२)

इतर राज्ये: ३० (५)

एकूण:  १५ हजार ५२५ (६१७)

ट्रेंडिंग बातम्या-

‘अनुजने माझी मान अभिमानाने उंचावली’; शहीद मेजर अनुज सूद यांना अखेरचा निरोप

मुंबईत IPS अधिकाऱ्याला कोरोनाची लागण; राज्यभरात 457 पोलिसांना कोरोना

महत्वाच्या बातम्या-

“मोदींसमोर बोलण्याची राज्यातील भाजप नेत्यांची हिंमत नाही”

कल्याण-डोंबिवलीतील नोकरदारांसाठी मोठी बातमी

एक वर्ष मोफत काम करण्यासाठी तयार, पण नोकर भरती करा- विनोद पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More