बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यात आज कोरोनाचे किती रुग्ण वाढले?; जाणून घ्या सर्व आकडेवारी

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 19 हजार 63 झाली आहे. आज 1089 नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. राज्यात आज 169 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3470 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 12 हजार 350 नमुन्यांपैकी 1 लाख 92 हजार 197 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह तर 19 हजार 63 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 39 हजार 531 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात 37 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या 731 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील 25, पुण्यातील 10, जळगाव जिल्ह्यात 1 तर अमरावती शहरात 1 मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरुष तर 18 महिला आहेत.

आज झालेल्या 37 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 17 रुग्ण आहेत तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहेत. 37 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये (73 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे- उद्धव ठाकरे

स्थलांतरित कामगारांकडून प्रवासी भाडं आकारु नये- प्रकाश आंबेडकर

महत्वाच्या बातम्या-

शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे

…म्हणून ठाकरे सरकारने प्रवीण परदेशींना बळीचा बकरा बनवला- किरीट सोमय्या

“सगळे नेते राजकारण बाजूला ठेवून एकवटल्याने माझा आत्मविश्वास आणखी दुणावला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More