आज उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर!

मुंबई |  ‘बाळासाहेबांना मानाचा मुजरा’ या खास कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार आहेत. 

‘ठाकरे’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या खास कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी अभिनेता संजय दत्त आणि सलमान खान यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती होणार का? याचा संभ्रम दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत आज मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकाच मंचावर येत आहेत. युतीसाठी ही शिवसेनेची ‘सिनेमा डिप्लोमसी’ तर नाही ना? अशा चर्चांना उत आला आहे. 

दरम्यान, काल कोल्हापुरात पत्रकारांनी “द अ‌ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर पाहणार की ठाकरे”? असा प्रश्न शरद पवारांना विचारल्यावर, संजय राऊतांनी ‘ठाकरे’ चित्रपट पाहण्याचं मला निमंत्रण दिलं आहे. मी ‘ठाकरे’ चित्रपट पाहायला उद्या मुंबईला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून न्यूझीलंड दौऱ्यासाठी शुबमन गिलला मिळाली संधी

-“सवर्णांना दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकणार नाही”!

-“10 टक्के आरक्षण देणाऱ्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही”

-आगामी निवडणुकांचं युद्ध जिंकायचं आहे, फेकू सरकार पाडायचं आहे- अशोक चव्हाण

-शरद पवार पंतप्रधान होतील असं वाटत नाही- रामदास आठवले

Google+ Linkedin