Weather News l आजपासून दिवाळीच्या सणाला सुरवात देखील झाली आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक भागात ऋतू बदलला नसल्याचं दिसून येत आहे. कारण राज्यात अद्यापही पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे दिवाळी सणाला देखील पाऊस हजेरी लावणार असल्याचं दिसून येत आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस हजेरी लावणार :
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सणाला पावसाचं विरजण होणार असल्याचं सांगितलं आहे. कारण पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होणार आहे. त्यामुळं मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी ‘दाना’ चक्रीवादळ धडकलं आहे. त्यामुळे आता हवेतील बाष्पाचा पश्चिमेकडे प्रवास सुरू झाला असल्याने पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच ‘दाना’ चक्रीवादळानंतर अरबी समुद्राच्या नैऋत्य भागामध्ये देखील वाऱ्यांची चक्राकार स्थिती कायम असल्याचं सांगितलं आहे.त्यामुळे आता पावसाचा अंदाज हा पुढील चार, पाच दिवस कायम असणार आहे.
Weather News l राज्यातील ‘या’ भागात थंडीची चाहूल :
दरम्यान, राज्यातील विदर्भासह पश्चिम घाटमाध्यावरील परिसरामध्ये पहाटेच्या वेळी हवेत गारठा जाणवण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र असं असलं तरी देखील उष्णतेचा दाह हा मात्र दुपारच्या वेळेत अडचणी वाढवताना दिसणार आहे. याशिवाय राज्यात सध्याच्या घडीला सोलापूर जिल्ह्यात 35.4 अंश इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद देखील करण्यात आली आहे.
याशिवाय महाबळेश्वर जिल्ह्यात 15.6 अंश इतक्या निचांकी तापमानाची नोंद देखील करण्यात आली आहे. सध्या कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, परभणी, नांदेड या भागांमध्ये हलक्या पावसासह गुलाबी थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
News Title – Maharashtra weather news
महत्त्वाच्या बातम्या-
चक्र बदलणार! देशात जनगणना कधी होऊ शकते?
आली आली दिवाळी! आज वसुबारस सण, जाणून घ्या पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त
वंचितची आठवी यादी जाहीर, आदित्य व अमित ठाकरेंविरोधात दिले उमेदवार
जयश्री थोरातांवर आक्षेपार्ह टीका करणारे वसंत देशमुख पोलिसांच्या ताब्यात!