Weather Update l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. कारण बंगालच्या उपसागरावरील वादळी वाऱ्यांनी थंडीच प्रमाण वाढलं आहे. अशातच उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींनी देखील गारठ्याचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढवले आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने राज्यात थंडीचा यलो अलर्ट देखील दिला आहे.
राज्यात थंडीची लाट कायम? :
नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सर्वाधिक पारा घसरला आहे. त्यामुळे या परिसरात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. यावेळी निफाडमध्ये 6 अंशांपर्यंत तापमान आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यात देखील तापमान कमालीचे घटले आहे. त्यामुळे या भागात रक्त गोठवणारी थंडी आहे.
तसेच राज्यातील महाबळेश्वर आणि इतर थंडीच्या ठिकाणांपेक्षा काही भागात थंडीचा कडाका जास्त प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे राज्यात काही दिवस अजून थंडीची लाट ही कायम राहणार आहे. याशिवाय राज्याच्या दक्षिण किनारपट्टीवर चक्रीवादळ तयार झाले असल्याने ढगाळ वातावरण देखील दिसून येत आहे. त्यामुळे या जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.
Weather Update l पुढील 3 दिवस थंडी वाढणार :
पुण्यात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे पुण्याचे तापमान 9.9 अंशावर आले आहे. अशातच गेल्या दोन, तीन दिवसांपासून राज्यभरात थंडीचा जोर वाढला आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच दहा अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्याच्या भोरमध्ये तापमानात घट झाल्याने शहरासह ग्रामीण भागात आता शेकोट्या पेटल्या आहेत.
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हा महाराष्ट्र राज्यावर देखील दिसून येत आहे. आता आलेले फेंगल हे चक्रीवादळ वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी आलेल्या दाना चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठे नुकसान झाले होते. आता फेंगलने चिंता वाढवली आहे. यामुळे देशातील दक्षिण भागात ऐन थंडीत पाऊस सुरू झाला आहे.
News Title : Today Maharashtra Weather Update
महत्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला? शिंदे व पवार गटाला कोणती पदे मिळणार; पाहा यादी
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, PF चे पैसे काढणं होणार सोप्पं
ठरलं! देवेंद्र फडणवीसच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?, तर, शिंदे-अजितदादा..
CM पदाच्या बदल्यात शिंदेंना हवीत ‘ही’ मोठी खाती?, अजितदादांच्या वाट्याला काय येणार?
फडणविसांच्या चेहऱ्यावर फूललेलं हास्य अन् शिंदेंचा पडलेला चेहरा..’त्या’ फोटोंची जोरदार चर्चा