मुंबई | राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागातील पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आज होणाऱ्या बैठकीतून दिलासा मिळणार होता. परंतु आज होणारी मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणारा निर्णय होईल अशी माहिती दिली होती.परंतु बैठक रद्द झाल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार?, असा सवाल विचारला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते बैठकीस उपस्थित राहू न शकल्याने आज होणारी बैठक रद्द करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्या मंत्रीमंडळाची बैठक मात्र नक्की होणार. त्यामुळे उद्या होणऱ्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे,
महत्वाच्या बातम्या-
अटक कोणाला करावी हे विचाराणं यालाच शोधपत्रकारिता म्हणतात का?; हायकोर्टाचा सवाल
एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नाही, तर उजेडात होईल- जयंत पाटील
“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर आम्हाला आनंदच आहे”
चेन्नईला ‘सुपर’ धक्का; ‘या’ अष्टपैलू खेळाडूची आयपीएलमधून माघार
स्थायी समितीची सभा घेण्यास हायकोर्टाची परवानगी!