बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 098 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1 हजार 698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पुण्यात कोरोनामुळे 22 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

पुण्यात सध्या 555 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 40 हजार 834 इतकी आहे. तर 24 हजार 440 सक्रिय कोरोनाबाधीत रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण 5 हजार 90 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून आजपर्यंत 2 लाख 11 हजार 304 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 11 हजार 310 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण

“आरक्षणासाठी अजित पवारांच्या घरावर मोर्चा काढा, मी पण त्यात सहभागी होईल” – नितीन राऊत

‘एटीएसने जप्त केलेली ‘ती’ व्हाेल्वो फडणवीसांच्या गुडबुक्समधील व्यक्तीची’; राष्ट्रवादीचा आरोप

“उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची, करावे तसे भरावे”

शिवसेनेला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याची शिवसेनेला सोडचिठ्ठी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More