बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्र कोरोना अपडेट, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र, आता Omicronचा धोका देखील वाढताना दिसत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली असून 699 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 16  कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 6 हजार 441  सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण (Active Corona Patient) उपचार घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 43 हजार 883 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 92 हजार 504 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 41 हजार 259 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Death) झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 68 लाख 75 हजार 975 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या 

“संजय राऊत नक्की शिवसेनेचे आहेत की राष्ट्रावादीचे?”

‘…तर आज युती तुटली नसती’; संजय राऊतांचा भाजप नेत्यांना टोला

“शरद पवार म्हणजे पाॅवर हाऊस नेते, त्यांचा नेम अचुक असतो”

“26 खासदार असणारा गुजराती पंतप्रधान होतो मग 48 खासदार असणारा महाराजांचा मावळा…”

“बॅचलर राहु नका, घरात बायको असली की माणसाचं डोक शांत राहतं”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More