बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! मुंबईत आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र, अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आनंदाची बाब म्हणजे आज मुंबईत नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची नोंद जास्त आहे.

मुंबईत आज दिवसभरात 288 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 412 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 3 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,35,659 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4616 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 15,911 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,12,723 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. प्रशासनाच्या कठोर पावलांमुळेच मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

“राज्यपालांच्या दौऱ्यावर बोलण्यापेक्षा पालकमंत्री असलेल्या जिल्ह्याचा आढावा घ्या”

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते- लालू प्रसाद यादव

शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा

“सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More