बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊ लागली आहे.

काल देशात 42 हजार 15 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे . नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होऊ लागल्याने पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर काल 36 हजार 977 नवे कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत.

काल देशभरात 3 हजार 998 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 04 लाख 18 हजार 480 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. देशभरात सध्या 4 लाख 7 हजार 170 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. भारतात 41 कोटी 54 लाख 72 हजार 455 नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ वेळेमध्ये सर्वाधिक भारतीय पाहतात पॉर्न, ‘हे’ राज्य आहे पहिल्या स्थानावर!

इंधनांवरील कर कमी होणार का?; केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“भारताला पाकिस्तान बनवण्यासाठी 1930 पासून योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांची संख्या वाढवण्यात आली”

सचिन वाझे प्रकरणामुळे वाचला होता राज कुंद्रा; जाणून घ्या वाघे-कुंद्रा केस कनेक्शन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More