बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मात्र, अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. आनंदाची बाब म्हणजे आज मुंबईत नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची नोंद जास्त आहे.

मुंबईत आज दिवसभरात 309 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 407 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 8 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

मुंबईची आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 7,36,862 एवढी आहे. तर मुंबईत सध्या 4345 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 15,937 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आजपर्यंत 7,14,166 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचलली होती. प्रशासनाच्या कठोर पावलांमुळेच मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

‘भाजप शिवसेनेचा कायमचा शत्रू नाही’; निलम गोऱ्हेंचं मोठं वक्तव्य!

राहुल, जडेजाने ठोकलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताकडे ‘इतक्या’ धावांची आघाडी, अँडरसन आणि रॉबिनसनची भेदक गोलंदाजी!

बुलेटवर कपल करत होतं अश्लील चाळे त्यानंतर गावकऱ्यांनी गाडी अडवुन…पाहा व्हिडीओ!

पुणे मेट्रोवरुन भाजप-राष्ट्रवादीत वाद पेटला! आता फडणवीस मेट्रोची पाहणी करणार

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यात आज नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More