बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईमध्ये अवघे ‘इतके’ रुग्ण सक्रिय

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी ही काही प्रमाणात दिलासादायक आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात एकूण 435 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच आज एकूण 560 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना आजची आकडेवारी काहिशी दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 6 हजार 20 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 97 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने मुंबईची कोरोनामुक्तीकडे आगेकूच होत असल्याचं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.

रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होईल, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत होती. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्या मागच्या काही दिवसात हळूहळू कमी झाली आहे.

थोडक्यात बातम्या –

“गुन्हेगार मला शुभेच्छा देतायत त्यात माझा काय दोष?, चुकीचे होर्डिंग असतील तर भाजपने काढावेत”

चिंता वाढली! नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात लक्षणीय वाढ

‘या’ वेळेमध्ये सर्वाधिक भारतीय पाहतात पॉर्न, ‘हे’ राज्य आहे पहिल्या स्थानावर!

इंधनांवरील कर कमी होणार का?; केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More