बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा आजची आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 216 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 304 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 06 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 328 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,86,071 इतकी आहे. तर पुण्यात 2548 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8742 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,77,781 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5844 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! पूराचा फटका बसलेल्या महाराष्ट्रासाठी केंद्राकडून 701 कोटींची मदत जाहीर

लोकहित जपणं याचा शिवसेनेशी काहीही संबंध राहिलेला नाही- नारायण राणे

त्वचेच्या सर्व समस्यांसाठी नारळ तेल आहे फायदेशीर, जाणून घ्या फायदे!

मोठी बातमी! ‘या’ कारणाने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेच्या तारखेत बदल

‘भयंकर आडाणी आलिया’,…म्हणून आलिया भट्ट होत आहे ट्रोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More