पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.
पुण्यात आज दिवसभरात 237 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 181 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 7 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.
पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,87,800 इतकी आहे. तर पुण्यात 2355 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8786 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,76,659 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 5453 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत.
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांशिवाय संसद शांत वाटते- लालू प्रसाद यादव
शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा
“सामान्य मुंबईकरांना छळण्यात ठाकरे सरकारला कसा विकृत आनंद मिळतो हे दिसलं”
अमित शहा आणि शरद पवारांच्या आजच्या बैठकीत नेमकं काय घडलं? पवार म्हणाले…
माझ्यावर दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार- चित्रा वाघ
Comments are closed.