बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 250 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 222 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 05 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 409 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,85,285 इतकी आहे. तर पुण्यात 3030 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8720 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,73,525 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8403 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

 

थोडक्यात बातम्या-

नागरिकांनो सावधान! देशात पुन्हा कोरोनाचा फैलाव वाढतोय

‘टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान भारताला हरवणार’; शोएब अख्तर पुन्हा बरळला

“न्यूड ऑडिशनला नकार दिल्यानं मला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती”

ब्रेकिंग! पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पेट्रोल, डिझेल न देण्याचा निर्णय

कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर, सांगलीतील ‘या’ गावाला चारही बाजूने पाण्याचा वेढा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More