बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 250 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 327 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 06 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 409 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,85,716 इतकी आहे. तर पुण्यात 2792 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8731 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,74,193 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6987 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-

27 जुलैबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन

भास्कर जाधवांना एवढा माज कसला?, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप

चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांनी हात जोडणं भास्कर जाधवांना रुचलं नाही, पळत जाऊन म्हणाले…

चिपळूणमध्ये मदत मागणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांनी हात उगारला, पाहा व्हिडीओ

“मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का हे एकदा पाहावं लागेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More