बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा झाला असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 220 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 304 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 05 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,88,902 इतकी आहे. तर पुण्यात 2295 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 9217 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,77,883 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7640 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत.

थोडक्यात बातम्या-

मराठे गोष्टी सांगत नाहीत तर ते इतिहास रचतात- उद्धव ठाकरे

“महाराष्ट्रातले भाजपचे नेते मोदींचं पण ऐकत नाहीत”

“राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष रसातळाला जातो हा इतिहास”

“सिद्धार्थ माझा प्रियकर नाही पण तो सतत आजूबाजूला हवासा वाटतो”

पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, पत्नीने संशय आलेल्या महिलेसोबत केलं हे धक्कादायक कृत्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More