शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी
पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.
पुण्यात आज दिवसभरात 238 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 237 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 04 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.
पुण्यात सध्या 198 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,89,970 इतकी आहे. तर पुण्यात 2125 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8832 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,79,008 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8837 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.
थोडक्यात बातम्या-
आमदार अशोक पवारांच्या ‘एक हात मदतीचा’, आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद; 28 ट्रक कोकणाकडे रवाना!
“शरद पवारांना करायचं काहीच नसतं फक्त भावल्या नाचवायच्या असतात, राहुल गांधींना लवकरच कळेल”
पुण्याच्या ‘या’ गावात महिलांना पुढचे 3 महिने गरोदर न राहण्याच्या सूचना!
राज्यपालांना परिस्थिती आणि जबाबदारीचं भान असावं – मुंबई उच्च न्यायालय
विनावर्दी कारवाई करणाऱ्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश!
Comments are closed.