बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारीही देखील अत्यंत धक्कादायक

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारीही वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

राज्यात आज 9927 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 12,182 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,89,294 रुग्णांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आलं आहेत. राज्यात एकूण 95,322 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता 93.34% झालं आहे. त्यासोबत पुणे जिल्ह्यातीलही आकडेवारी वाढत्या आलेखाप्रमाणे आहे.

पुण्यात सध्या 321 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,10,169 इतकी आहे. तर पुण्यात 723 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4903 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,98,246 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6090 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊनमध्ये आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे. 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात अशा प्रकारचं अंशत: लॉकडाऊन राहणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय घोषित केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

मनसुख हिरेन यांची हत्या करुन मृतदेह खाडीत फेकला- देवेंद्र फडणवीस

…म्हणून सत्ताधाऱ्यांनी सभागृहात दिल्या ‘अमित शहा खुनी है’ अशा घोषणा!

संतापजनक! मुख्यध्यापकानेच केला दहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार

मुंबई पोलिसांचे ‘थोबाड काळे झाले’ अशी भाषा देवेंद्र फडणवीस कशी करू शकतात – अनिल देशमुख

खासदार नुसरत जहाँ यांच्या ‘त्या’ खास टॅटूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More