बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याचा भाव आज पुन्हा वाढला, जाणून घ्या ताजे दर

नवी दिल्ली | कोणताही सन म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

एमसीएक्सवर आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ अनुभवायला मिळाली आहे. आज सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ झाली आहे. आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 227 रुपये प्रती तोळा आहे.

आज चांंदीच्या दरात मात्र घट अनुभवायला मिळाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे 200 रुपयांची घट झाली आहे.  आज एमसीएक्सवर चांदीचा दर 68 हजार 500 रुपये प्रती किलो आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

“आरक्षण संपुष्टात आणणं हा भाजप आणि संघाचा डाव”

“देवाच्या काठीला आवाज नसतो शंभर अपराध भरले की फटका बसतोच, पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन कारखाना मिळवला”

“स्वच्छ चारित्र्याच्या चंद्रकांत पाटलांच्या पत्रानंतर जरंडेश्वर कारखान्यावर कारवाई झाली, ही कारवाई राजकीय हेतूने आहे”

पवार कुटुंबाने अनेक कारखाने लाटलेत, रोहित पवारांचीही चौकशी करा- भाजप

जरंडेश्वर कारखाना प्रकरणात अजित पवारांचं नाव येताच अण्णा हजारे म्हणाले…

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More