बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्वोच्च स्तरापेक्षा सोनं तब्बल 8211 रुपयांनी घसरलं; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे,. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथली लोकसंख्या आणि या लोकसंख्येला असलेली सोन्याची चाहत या गोष्टीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

भारतात गेल्यावर्षी सोन्याची किंमत सर्वोच्च स्तरावर पोहोचली होती.  2020 मध्ये सोनं तब्बल 56 हजार 191 रुपये प्रति तोळे झालं होतं. आज एमसीेएक्सवर सोन्याचा दर सर्वोच्च स्तरापेक्षा तब्बल  8  हजार 211 रुपयांनी स्वस्त होतं. आज एमसीएक्सवर 24 कॅरेट सोन्याचा दर  47 हजार 980 रुपये प्रति तोळा आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीत देखील गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहे. आज एमसीएक्सवर चांदीच्या किंमतीत 1 हजार रुपयांची घट पाहायला मिळाली आहे. आज एमसीएक्सवर प्रति किलो चांदीचा दर 69 हजार रुपये एवढा आहे.

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या – 

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

“नागपूरचा विकास पहिल्या पावसात भिजून गेला”

“केंद्रातील मंत्रीच नाही तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”

बाॅलिवूडवर पून्हा शोककळा! हाॅरर चित्रपटांचे निर्माते कुमार रामसे यांचं निधन

‘शिवसेना नेहमीच निवडणुकीसाठी तयार असते’; शिवसेनेच्या बड्या नेत्याची गर्जना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More