बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांंदीचे भाव उतरले; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | कोणताही सण म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. अशातच अलिकडे सोन्याच्या दरात मोठी पडझड पाहायला मिळत आहे.

आज सराफा बाजारात सोन्याच्या भावात तब्बल 169 रुपयांची घसरण झाली आहे. 169 रुपयांच्या घसरणीसह आज दिल्लीत सोन्याचा दर 46 हजार 796 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील आज मोठी घट अनुभवायला मिळाली आहे. आज चांदीच्या दरामध्ये 300 रुपयांची घसरण झाली आहे. 300 रुपयांंच्या घसरणीसह चांदीचा भाव आज 67 हजार 611 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा न्यायालयाच्या कक्षेत

“काँग्रेसला 70 वर्ष दिली मला 5 वर्ष द्या, पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्याचं काय झालं?”

रजनीकांत यांनी राजकारणाला ठोकला कायमचा रामराम; पक्षही केला बरखास्त!

‘हे सरकार अहंकारी असेल तर सत्तेतून काढावे लागेल’; राकेश टिकैतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राज्यात सर्वदूर पावसाची हजेरी; पुढील पाच दिवस ‘या’ भागांमध्ये पडणार संततधार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More