बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!

नवी दिल्ली | सोन्याच्या भावात वारंवार चढ-उतार पहायला मिळत असतात. अशातच आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली सराफ बाजारात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरुन प्रति 10 ग्रॅम 48040 रुपयांवर गेला आहे.

जागतिक बाजारपेठेत सोन्याची किंमत प्रति औंस 0.4 टक्यांनी घसरुन 1,769.03 डॉलर झाली. या घसरणाऱ्या किंमतीमुळे सोनं आणखी स्वस्त झालं आहे. भविष्यातही सोन्याच्या किंमती आणखी कमी होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

दुसरीकडे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा आजचा भाव हा 1 टक्क्याने घसरला असून 687 हजार 800 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तसंच जागतिक बाजारात चांदी 1.1 टक्क्यांनी घसरुन 26.71 डॉलर प्रति औंस झाली आहे.

दरम्यान, बुधवार 17 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 157 रुपयांनी घसरला होता. यामुळे सोन्याचा भाव दर दहा ग्रॅम 46 हजार 720 रुपये झाला होता. त्याच दिवशी चांदीच्या भाव 109 रुपयांनी घसरण पहायला मिळाली होती. त्यामुळे चांदीचा भाव 69 हजार 465 रुपयांवर पोहोचला होता.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास पुणेकर! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

‘राईचा पर्वत करण्याची गरज नाही’; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

“झोपडपट्टीमध्ये जाणारे बळी हे शिवसेनेचं पाप; महापालिका निवडणुकीत यांना कठोर शिक्षा द्या”

“महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तिला विठ्ठल माफ करणार नाही”

इंजेक्शन पाहून लहान मुलासारखी रडायला लागली महिला, व्हिडीओ तुफान व्हायरल

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More