बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कौल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट पाहायला मिळत होती. मात्र, आज सोन्याच्या दरात तब्बल 260 रुपयांची वाढ अनुभवायला मिळाली आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 810 रुपये प्रती तोळ्यावर बंद झाला आहे.

सोन्याच्या दरात आज वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र घट पाहायला मिळाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे 300 रुपयांची घट झाली आहे. 300 रुपयांच्या घटीसह आज चांदीचा दर 67 हजार 500 रुपये प्रती किलोवर बंद झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

‘या’ देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर घातली बंदी

पोर्नोग्राफी प्रकरणी नवऱ्याला अटक झाल्यावर शिल्पाने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“सरकार चालवता येत नाही म्हणून सर ‘कार’ चालवतात”

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या 100 दिवसातील सर्वात कमी रूग्णसंख्येची नोंद

सैराटच्या आर्चीचं काळीज कुणी चोरलं?, पाहा नेमकं काय म्हणतेय…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More