बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबो! आज सोन्या-चांदीचे दर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वाढले; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | कोणताही सन म्हटलं की सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळते. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देत आहेत. भारतात सोन्याची वाढती मागणी पाहता गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

एमसीएक्सवर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ अनुभवायला मिळाली आहे. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 740 रुपये प्रती तोळा होता. आज हाच दर तब्बल 450 रुपयांनी वाढला आहे. एमसीएक्सवर आज सोन्याचा दर 47 हजार 190 रुपये प्रती तोळा आहे.

सोन्याप्रमाणेच आज चांंदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे तब्बल 1100 रुपयांची वाढ झाली आहे. काल एमसीएक्सवर चांदीचा दर 67 हजार 600 रुपये प्रती किलो होता. आज हाच दर 68 हजार 700 रुपये प्रती किलो झाला आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

‘चुकीला माफी नाही’ गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

“आघाडी सरकार आपल्याच ओझ्याने पडणार, फक्त वेळेचा प्रश्न आहे”

“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय ते योग्य नसून कृषी कायद्यात बदल आवश्यक”

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; एलपीजी गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More