बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 286 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1 हजार 200 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 23 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 599 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,47,629 इतकी आहे. तर पुण्यात 28578 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5137 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,13,914 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 16,578 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या – 

मंत्री असावा तर असा! जितेंद्र आव्हाडांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

…तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही राजीनामा घ्यावा- नाना पटोले

‘रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी सांगितलं का?’; यड्रावकरांनी सांगितली अंदर की बात

…अन् पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

माझं ठरलंय..फास्ट बॉलिंग, गुगली आणि बॅटिंगही करणार- देवेंद्र फडणवीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More