पुणे | पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.
पुण्यामध्ये आज दिवसभरात 1 हजार 925 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 667 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 7 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.
पुण्यात सध्या 394 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 21 हजार 210 इतकी आहे. तर पुण्यात 13 हजार 225 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4 हजार 969 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2 लाख 36 हजार 016 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 8 हजार 044 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! पुण्यामध्ये कोरोना लस घोटाळा; तब्बल इतक्या हजार लसी गायब
सचिन वाझे प्रकरणावर शरद पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…
ऐन निवडणुकीच्या तोंडावर केरळमध्ये काँग्रेसला धक्का; ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीत सामील!
सचिन वाझेंच्या अडचणीत वाढ; तीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळले!
पुण्यातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील आगीत लाखोंचं नुकसान; कोंबड्या, बकऱ्या होरपळल्या!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.