बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 953 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 389 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 61 जणांना प्राणांना मुकावं लागलं आहे. तर 15 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1014 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,22,982 इतकी आहे. तर पुण्यात 50 हजार 473 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 700 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,66,809 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 25 हजार 504 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणीही शहरात काटेकोरपणे केली जाणार आहेत.

थोडक्यात बातम्या –

…म्हणून मुलीला निर्वस्त्र करुन तिच्यासोबत अघोरी प्रकार, वर्ध्यातील घटनेनं महाराष्ट्रात खळबळ

“मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्र्यांना आवरा”; भर बैठकीत देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

नागरिकांनो तयारी ठेवा!; मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात मांडली ‘ही’ महत्त्वाची भूमिका

महाराष्ट्रात संपूर्ण लॅाकडाऊन होणार?, आत्ताच बाहेर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती

अमृता फडणवीसांनी का टाकला हा फोटो?, जाणून घ्या गुपित

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More