बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 509 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1410 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 33 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 589 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,44,343 इतकी आहे. तर पुण्यात 26515 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5114 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,12,714 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 16,185 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘साडी नाही तर बरमुडा घाला’; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली

काय सांगता! टिकटॉक स्टारपेक्षाही खरतनाक कावळ्याचा ‘कॅटवॉक’, पाहा व्हिडीओ

‘…म्हणून तर आदित्य ठाकरेंना कोरोनाची लागण झाली नाही ना?’; भाजप नेत्याचा सवाल

“देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत”

देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला- नाना पटोले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More