बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! आज चांदी 2 हजारांनी तर सोनं 600 रुपयांनी उतरलं; वाचा ताजे दर

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. काल सोने बाजारात मोठी पडझड अनुभवायला मिळाली आहे. तसेच आज देखील सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. आज प्रती तोळा सोन्यामागे तब्बल 600 रुपयांची घट झाली आहे. 600 रुपयांच्या घटीसह आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 47 हजार 900 रुपये प्रती तोळ्यावर आले आहेत.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरात देखील आज मोठी घट झाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे तब्बल 2000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या एमसीएक्सवर चांदीचा दर 69 हजार 500 रुपये प्रती किलो आहे.

सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोनं घालून मिरवणं एवढंच नव्हे, तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोन्याला प्राधान्य देतात. अलीकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे.

दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. या सोन्याच्या दरात स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या – 

“शिवसेनेमुळे माजी खासदार झालेल्या नेत्याकडून आमची बदनामी”

“अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणं म्हणजे विकृती”

‘उद्धवजी, भाजपसोबत पुन्हा जुळवून घेतल्यास बरं होईल’; ‘या’ शिवसेना आमदाराच्या पत्रानं खळबळ

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपरी-चिंचवडची तहान भागवणारं ‘हे’ धरण 33.26 टक्के भरलं

एक दिवस दिलासा देऊन पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More