बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो काळजी घ्या!; कोरोना रुग्णवाढीची आजची आकडेवारी देखील अत्यंत धक्कादायक

पुणे | पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच शहरात वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आता संपर्क शोध मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र तरीही आकडे काही कमी होण्याचं नाव घेत नाय्येत.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 766 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 391 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 7 जणांचा मृत्य झाला आहे. तर मृतांमधील तीन रूग्ण हे पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 231 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,00,462 इतकी आहे. तर पुण्यात 3290 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.  आत्तापर्यंत एकूण 4881 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 1,91,691 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर आज 6556 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र अशातच रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढून लागल्यानं चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना मास्क लावणं गरजेचं आहे. तर सार्वजनिक ठिकीणी कमीत कमी गर्दी करण्याचा प्रयत्न करावा त्यासोबत आपले हात वारंवार सॅनिटाईज करावे. यामुळे कोरोनाच्या वाढत्या फैलावाला आपण काही प्रमाणात आळा घालू शकतो.

थोडक्यात बातम्या- 

संजय राठोड यांच्याविरोधात तक्रार देण्याची हिम्मत दाखवणाऱ्या स्वरदा बापट कोण?, जाणून घ्या

“कोरोनाची लस भारतात कधी उपलब्ध होईल, मला कोणी सांगू शकेल का?”

पूजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांना हवं ते मिळालं, आता कारवाई होणार?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली कार, पाहा व्हिडीओ!

संजय राठोड यांना मोठा धक्का; खासदार गिरीश बापट यांच्या सूनेकडून पोलिसात तक्रार दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More