बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 931 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1,076 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 66 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 24 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1328 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,63,103 इतकी आहे. तर पुण्यात 15,043 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7887 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,40,173 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 12226 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखीन कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या-  

महाराष्ट्रातील ‘या’ शहराला कोरोनातून मोठा दिलासा; मृत्यूचं प्रमाण कमी होऊन बरे होणाऱ्यांची संख्या वाढली

हा भेदभाव का?, दुसऱ्या राज्यांमधील जनतेच्या प्रति आपली जबाबदारी नाही का?- पृथ्वीराज चव्हाण

महत्त्वाची बातमी! कोरोनाचा संसर्ग हवेतून होण्याचा धोका, केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

मोठी बातमी! रेमडेसिविर इंजेक्शन आता कोरोना रूग्णांना दिलं जाणार नाही; WHO ने दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

भारताच्या प्रमुख गोलंदाजावर दु:खाचा डोंगर, कोरोनामुळे वडिलांचं निधन

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More