बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाब्बास पुणेकरांनो! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर 3000 पेक्षा जास्त डिस्चार्ज

पुणे |  पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 1693 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3,033 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 72 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 24 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1413 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,57,986 इतकी आहे. तर पुण्यात 22304 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7659 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 428023 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 12409 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमा झालेली आकडेवारी अशात प्रकारे आणखीन कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या- 

लग्नाची वरात पोलीस स्टेशनच्या दारात! एका नवरीशी लग्नासाठी आले दोन नवरदेव, त्यानंतर घडलं असं काही की…

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मोठी बातमी! काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या शरीरात ‘हा’ नवा व्हायरस, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

“पांढऱ्या पायाचं सरकार आलं आणि मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं”

पोलिसासोबत संबंध ठेवण्यासाठी सराफाची पत्नी करायची असं काही; काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More