बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! पुण्यात आज नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रूग्णांची संख्या जास्त

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 1021 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 2892 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 68 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 22 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1364 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,61,008 इतकी आहे. तर पुण्यात 16,523 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7795 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,36,690 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 9258 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखीन कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या- 

लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल सर्वोच्च न्यायालयाचा ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्र्यांकडे प्रेयसीचं लग्न थांबवण्याची मागणी करणाऱ्या तरुणाची ‘ती’ प्रेयसी आली समोर म्हणाली…

“उद्या निवडणुका घ्या, मोदी 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील”

अभिनेत्री गौहर खानने शेअर केला पतीसोबतचा बेडरूममधील व्हिडीओ, व्हिडीओ तुफान व्हायरल

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More