मुुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून वाढत चाललेला दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश दिले आहेत. सध्या कोरोनाची आकडेवारीही वाढताना दिसत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.
राज्यात आज 10,216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज नवीन 6,467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 20,55,951 रुग्णांना दवाखान्यातून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहेत. राज्यात एकूण 88,838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झालं आहे.
राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 53 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकुण 52 हजार 393 इतका झाला आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेट हा सातत्याने 93 ते 93 टक्क्यांच्या आसपास आहे. तर पुण्यातील आकडेवारीही धक्कादायक आहे.
दरम्यान, पुण्यात सध्या 300 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 20 लाख 63 हजार 083 इतकी आहे. तर पुण्यात 6 हजार 160 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4 हजार 881 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 19 लाख 53 हजार 042 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7 हजार 267 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
राज्यात आज 10216 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6467 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2055951 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 88838 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.52% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 5, 2021
थोडक्यात बातम्या-
मनसुख हिरेनचं नक्की काय झालं? संपूर्ण घटनाक्रम; वाचा सविस्तर…
बाबो! रिषभ पंतने जेम्स अँडरसनला मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का, पाहा व्हिडीओ
44 किलो गांजा जप्त, आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार
कौतुकास्पद! रूग्णांना त्वरित रक्त मिळण्यासाठी अभिनेता सोनू सूदनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल
‘चोर ज्यांना घाबरतात त्यांना नरेंद्र मोदी म्हणतात’; कंगणाचं तापसी आणि अनुरागवर टीकास्त्र
Comments are closed.