दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी
मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पाहायला मिळत आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आल्यामुळे नागरिकांचं विनाकारण घराबाहेर पडणं बंद झालं परिणामी रुग्ण संख्याही घटली. त्यानंतर महाराष्ट्रात नागरिकांना निर्बधांमधून सूट देण्यात आली आहे.
दिवसभरात राज्यात 05 हजार 609 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली तर 07 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. याशिवाय राज्यात दिवसभरात 151 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 61 लाख 59 हजार 676 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) 97 टक्के एवढा झाला आहे.
दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या विषाणूने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोरोना नेमका कधी संपणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
थोडक्यात बातम्या-
घरची गरिबी, वडिलांचा पानाचा ठेला, पण क्रिकेटचा नादच बेक्कार, आता थेट इंग्लंड दौऱ्यावर!
बालाजी तांबेंच्या ‘या’ तक्रारीमुळे बाळासाहेब ठाकरेंनी हातात घेतली होती काठी, वाचा थोडक्यात किस्सा!
आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी
“मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या ‘त्या’ प्रस्तावामुळेच आरक्षण रखडलं”
Comments are closed.