बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 3 हजार पार!

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 3 हजार 226 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 268 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 35 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 8 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 725 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,64,885 इतकी आहे. तर पुण्यात 32 हजार 806 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 270 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,26,809 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 13 हजार 436 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण तरीही कोरोना रूग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

मनोरंजनाच्या पडद्यावर देखील कोरोनाचं सावट ‘या’ शोमधील 18 जणांना कोरोनाची लागण

पैसे थेट खात्यावर जमा करा मग लॉकडाऊनचं बघा- पृथ्वीराज चव्हाण

गिरीश महाजन म्हणाले ईडी आली की कोरोना होतो, आता एकनाथ खडसेंचा पलटवार, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More