बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी 2 हजार पार!

पुणे | पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, अस आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागत कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील. पुण्यातही कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. आजची आकडेवारीही धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 587 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 769 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 16 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. त्यातील 5 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 425 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 23 हजार 797 इतकी आहे. तर पुण्यात 15 हजार 032 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4 हजार 980 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2 लाख 03 हजार 785 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 11 हजार 230 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

थोडक्यात बातम्या – 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा- नारायण राणे

‘सचिन वाझे शिवसेनेचे वसुली एजंट’; देवेंद्र फडणवीसांकडून आणखी धक्कादायक आरोप

महिला फाटलेल्या जीन्स घालतात हे बरोबर आहे का?; भाजपच्या मुख्यमंत्र्याचा सवाल

भारताचा पराभव विराट कोहलीच्या जिव्हारी, ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

झोमॅटो बाॅय प्रकरणात तनुश्री दत्ताची एंट्री, परिणीती चोप्राला तनुश्रीचा सवाल, म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More