बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा आजची आकडेवारी..

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. राज्य शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या घटवण्यात कधी यश येत आहे तर कधी रूग्णसंख्या वाढते आहे हे गेल्या आठवडाभरापासून पाहायला मिळत आहे. काल नव्याने नोंद झालेल्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 2 हजार 879 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 678 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 82 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 19 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1413 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,33,089 इतकी आहे. तर पुण्यात 39 हजार 839 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7 हजार 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,86,196 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 15 हजार 98 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान,कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरानाच्या या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी तीन जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.

थोडक्यात बातम्या- 

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सलग 5 तास कोरोनाबाधीताचा मृतदेह रूग्णालयाबाहेर होता पडून

सीटी स्कॅनमुळे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो मग सीटीस्कॅन करावं की नाही?, तात्याराव लहाने म्हणाले….

“बंगालची वाघीण जिंकली म्हणणारे आता मूग गिळून गप्प का आहेत?”

“महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज पण मिळतात फक्त…”

येत्या काही तासात या ‘6’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; शेतकऱ्यांसाठी खबरदारीच्या सूचना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More